गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल बंद झालेत. घरगुती गॅस बाबतही तारांबळ आहे. अशातच भाजी मार्केट मात्र पूर्णपणे ओस पडलेली दिसून येत आहेत. केवळ दहा टक्केच भाजी विक्री होत असून खराब झालेली भाजी दररोज जनावराला किंवा कचऱ्यात टाकण्याची वेळ भाजी विक्रेत्यांवर आली आहे. त्यामुळे युद्धाची झळ गॅस, हॉटेल नंतर आता थेट सर्वसामान्य भाजी विक्रेत्यांना बसलेली दिसून येते आहे. याचबाबत पंढरपूरच्या भाजी मार्केटमधून सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी.