पुण्यात मांजरीने पोपटाचा पिंजरा पाडल्यामुळे दोन कुटुंब समोरासमोर भिडले. दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. पुण्यातील ताडीवाला रस्त्यावरील भारत तरुण मंडळा समोर धक्कादायक प्रकार घडलाय. पोपटाच्या मालकाला मारहाण केल्या प्रकरणी मांजरीचा मालक दिनेश पोताबत्तोनी याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय.