LPG Crisis| एलपीजी टंचाईचा फटका फूड डिलिव्हरी क्षेत्राला; Swiggy, Zomato च्या ऑर्डरमध्ये मोठी घट

इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा परिणाम देशातील एलपीजी पुरवठ्यावर होत आहे... याचा थेट फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला बसत असून, त्याचबरोबर फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो आणि स्विगीवरही ऑर्डरमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी हजारो गिग वर्कर्सच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. एलपीजी सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्यामुळे रेस्टॉरंट, क्लाउड किचन आणि ढाबे यांचे काम थांबले आहे. काही ठिकाणी हॉटेल्सना मर्यादित क्षमतेने काम करावे लागत आहे, तर काही ठिकाणी व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याचा थेट परिणाम ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांवर होत असून, ग्राहकांकडून येणाऱ्या ऑर्डरमध्ये मोठी घट झाली आहे.

संबंधित व्हिडीओ