अकोल्यात गॅससाठी नागरिकांची झुंबड, वर्ध्यात सिलिंडरचा काळाबाजार? शेगावात डिझेल-पेट्रोल संपणार?

अकोल्यात दिवसेंदिवस गॅस टंचाईचे तीव्र परिणाम दिसून येत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.. शहरातील धनलक्ष्मी गॅस एजन्सीसमोर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सिलेंडर मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. अनेक ठिकाणी नागरिकांना तासन्तास उभे राहून सिलेंडर मिळवावा लागत आहे.वर्ध्यातील एका ग्राहकाने थेट तक्रार करत जादा पैसे घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.संबंधित ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर देताना अधिकृत दरापेक्षा तब्बल १३५ रुपये जादा आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे बोलले जात. शेगाव शहरातील प्रमुख पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा पूर्णपणे संपला असून,पेट्रोलचा साठाही आज संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः खामगाव रोडवरील प्रसिद्ध जगदगुरु राजेश्वर माउली पेट्रोल पंपावर इंधनाचा खडखडाट पाहायला मिळत आहे.

संबंधित व्हिडीओ