मुंबईतील गॅस सिलेंडर टंचाईचा फटका टाटा कॅन्सर हॉस्पिटललाही बसलाय.. हॉस्पिटल बाहेर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवण वाटप करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांवर देखील याचा परिणाम झालाय.. टाटा कॅन्सर हॉस्पिटल बाहेर मोफत जेवण वाटप करण्यात येतं.. या परिसरातील छोटे-मोठे हॉटेल्स बंद असल्याने या ठिकाणच्या जेवणासाठी रुग्ण आणि नातेवाईकांची संख्या वाढलीय.. एकीकडे ही मागणी वाढली आहे तर दुसरीकडे ज्या केटरिंग चालकासोबत या संस्थेने करार केला आहे त्या केटरिंग चालकाने देखील गॅस मिळत नसल्याने जेवणाचे दर वाढवलेत.. यामुळे दुहेरी संकटांना या स्वयंसेवी संस्थेला तोंड द्यावं लागतंय..