Dharashiv Unseasonal Rain| लोहारासह,उमरगा तालुक्यातील कदेर परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे नुकसान

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आणि लोहारा तालुक्यांसह कदेर परिसरात अचानक झालेल्या अवकाळी पावसाने आणि जोरदार गारपिटीने शेती पिकांचे मोठे नुकसान झालंय. हवामान बदलामुळे काढणीसाठी तयार असलेला कांदा, ज्वारी आणि गहू या पिकांना मोठा फटका बसला आहे. गारांच्या तडाख्यामुळे पिके जमिनीवर पडली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या नुकसानीमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

संबंधित व्हिडीओ