फरार असणाऱ्या राजेंद्र हगवणेच्या अडचणी आता चांगल्याच वाढणार आहेत कारण खुद्द अजित पवारांनी देखील हगवणे कुटुंबावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. नालायक माणसं माझ्या पक्षात नकोत अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय.