राज्याच्या शालेय शिक्षण विभागावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये मोठी माहिती समोर आलेली आहे. नागपूरच्या शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक आणि संभाजीनगरच्या विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक करण्यात आलेली आहे.