चीन, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियाला सध्या पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यू साउथ वेल्स मधील शहरांना सर्वाधिक फटका पावसाचा बसलाय. तर अर्जेंटिनामध्ये कधी नव्हे इतका पाऊस कोसळला. चीनमध्ये तर दोन हजार पंधरा नंतर पहिल्यांदाच बेलिउ नदीला आलेल्या पुरामुळे सगळे रेकॉर्ड मोडले गेलेत. या ठिकाणी अशी परिस्थिती का आलेली आहे आणि भविष्यात मानवाला अशाच अस्मानी संकटाचा सामना करावा लागणार का? याचा आढावा घेऊयात.