पुण्यामधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हुंड्या संदर्भात होणाऱ्या छळाचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे. हुंड्या संदर्भामध्ये होणाऱ्या छळाबाबत मुंबईतून सुद्धा धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मुंबईमध्ये दोन हजार चोवीस मध्ये चारशे हुंड्या संदर्भातील छळाचे गुन्हे दाखल झाले आहेत तर दोन हजार चोवीस मध्ये हुंड्या संदर्भातील छळामुळे एकोणीस महिलांचा मृत्यू झाला आहे.