मुंबईमधील नाले सफाई पाहणी बाबत शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीख खेच होत असल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी नाले सफाई बद्दल दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी नालेसफाई बद्दल समाधान व्यक्त केलं आणि त्यामध्येच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा नालेसफाईची पाहणी केली त्यावेळी त्यांनी नालेसफाईबाबत समाधान व्यक्त केलंय. त्यामुळे आता भाजप शिवसेनेमध्ये नाले सफाई वरून मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय.