Jyoti Waghmare यांच्याकडून राऊतांविरोधात तक्रार दाखल, तक्रारीनंतर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून संजय राऊत यांच्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलीय.. राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.. राऊतांकडून सातत्याने होत असलेली अभद्र भाषा, अश्लील शिवीगाळ आणि महिला लोकप्रतिनिधींचा जाहीर अपमान याविरोधात वाघमारेंनी ही तक्रार केलीय.. संजय राऊत यांच्या गेल्या चार वर्षांतील वादग्रस्त विधानांची आणि वर्तनाची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार वाघमारे यांनी नवी दिल्ली येथील महिला आयोगाच्या मुख्य कार्यालयाला पाठवलेल्या ईमेल तक्रारीत केलीय.. दरम्यान, शिवसेनेने दाखल केलेल्या तक्रारीबद्दल संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया...

संबंधित व्हिडीओ