केतन अग्रवाल हत्या प्रकरणात चौकशीदरम्यान सिया गोयलने मोठा गौप्यस्फोट केलाय. सियाला केतन हा मनापासून कधीच पसंत नव्हता. केतनच्या व्यक्तिमत्त्वातल्या काही गोष्टी सियाला खटकायच्या. त्यामुळे केतनसोबत तिला लग्नच करायचं नव्हतं, पण निव्वळ घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण त्याच्यासोबतचं लग्न मोडलं नसल्याचा दावा सियाने पोलिस चौकशी दरम्यान केलाय. तर दुसरीकडे केतन हत्या प्रकरणात केवळ सिया आणि तिचा प्रियकरच सामिल नाहीत, तर आणखीही काहीजण या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा दावा केतनच्या वडिलांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट