वसई-विरार परिसरात कोरोनाचा पहिला बळी गेलाय.नायगावमध्ये 43 वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झालाय.रुग्णावर मुंबईच्या रहेजा रूग्णालयात उपचार सुरू होते.रूग्णाला कोरोना आणि न्युमोनिया झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.दरम्यान लक्षणं आढळल्यास तातडीने कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय.