मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नेरुळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर जोरदार राजकारण रंगलं. पोलिसांकडून अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना नोटीस बजावण्यात आली. हीच नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे आज नेरुळला पोहोचले. त्यावेळी मनसेनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय. इतकंच नाही तर अमित ठाकरे यांनी यावेळी सरकारला इशाराही दिलाय.