चाकणमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.. पुणे-नाशिक महामार्गावरील तळेगाव चौक आणि आंबेठाण चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागताय.. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.. दरम्यान, याचवेळी तळेगाव चौक आणि आंबेठाण चौकापासून काही अंतरावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांची जोरदार चर्चा आता चाकणमध्ये सुरू झाली आहे. या उड्डाणपुलांबाबत चाकणकरांना नेमके काय वाटते? वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या पुलांचा उपयोग होतोय का? यासंदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी...