राज्यात महाविकास आघाडी आणि केंद्रात इंडिया आघाडीमध्ये मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शऱद पवारांच्या राष्ट्रवादीतील धुसफूस आता समोर आलीय. राज्यातील काँग्रेसचा राष्ट्रवादीवर काय राग आहे, ते का नाराज आहेत हे माहिती नाही अस थेट वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलीय. यावर विजय वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिलंय. मोदींना भेटले तरी राग येत नसल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलंय.