Breaking News| खासगी क्लासेससाठी नवा कायदा आणण्याची तयारी, शालेय शिक्षण विभागाकडून मसुदा जाहीर

राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. 'महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र अधिनियम 2026' या नव्या कायद्याचा मसुदा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्यावर नागरिकांना 4 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत. खासगी क्लासेस चालवण्यासाठी विविध नियम आणि अटी प्रस्तावित करण्यात आल्या असून त्यांचे उल्लंघन करणाऱ्या शिकवणी केंद्रांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे हित जपणे आणि खासगी शिकवणी क्षेत्रात शिस्त आणणे हा या कायद्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित व्हिडीओ