शेतांमध्ये आता औषधांची फवारणी जमिनीवरून नव्हे, तर आकाशातून होत आहे.आणि विशेष म्हणजे या बदलाचे नेतृत्व गावातील महिला करत आहेत.
छत्तीसगडमधील ग्रामीण भागात महिला ड्रोनच्या माध्यमातून शेतांमध्ये औषध फवारणी करत आहेत. 'नमो ड्रोन दीदी' उपक्रमामुळे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण झाल्या आहेत. राज्यातील 15 ड्रोन दीदी शेतकऱ्यांना ड्रोन स्प्रेची सुविधा देत आहेत.
'नमो ड्रोन दीदी' योजनेअंतर्गत स्वयं सहाय्यता गटांतील महिलांना ड्रोन चालविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि संसाधने उपलब्ध करून दिली जातात. प्रत्येक ड्रोन दीदीला कृषी ड्रोनसह मोफत प्रशिक्षण, इलेक्ट्रिक वाहन आणि जनरेटर दिला जातो. एका ड्रोन सेटअपसाठी सुमारे 14 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात येते. ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचत आहेत, तर महिलांसाठी हा उत्पन्नाचा नवा स्रोत ठरत आहे. ड्रोन स्प्रे सेवेच्या बदल्यात ड्रोन दीदींना प्रति एकर सुमारे ३०० ते ४०० रुपये उत्पन्न मिळतंय.