नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे. अधिवेशन काळात उपराजधानीत ८ हजारांहून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि होमगार्ड तैनात राहतील. पाच SRPF कंपन्यांसह कमांडो आणि विशेष पोलीस पथकेही सुरक्षेची धुरा सांभाळतील. अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिलीय.