Nalasopara,Vasai मध्ये पोलिसांनाच संरक्षणाची गरज? नालासोपाऱ्यानंतर वसईतही वाहतूक पोलिसांना मारहाण

नालासोपारा आणि वसईत पोलिसांनाच संरक्षण देण्याची गरज आहे अशी आता अवस्था निर्माण झाली, लासोपार्‍यानंतर आता वसईत देखील दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केलीय. एका रिक्षा चालकाने पोलिसांच्या अंगावर पेटती सिगारेट फेकून कानशीलात लगावली. नाकाबंदी दरम्यान आरोपीने रिक्षा न थांबवता पोलिसांनाच मारहाण केली, नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच आता संरक्षणाची गरज आहे का असं चित्रच आता उपस्थित होतंय, दोन दिवसांपूर्वीच बापलेकाने 2 पोलिसाना बेदम मारहाण केली होती.

संबंधित व्हिडीओ