रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.त्यातच काही ठिकाणी मुंबई- गोवा महामार्गाच्या अर्धवट कामाचा वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय.दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरून परशुराम घाटातून प्रवास करताना वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. परशुराम घाटातील संरक्षक भिंत उभारण्याचं काम अर्धवट स्थितीत आहे.पावसामुळे या कामाला ब्रेक लागला आहे.त्यात चिखल आणि पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर घाटातील रस्त्यावर येत आहे.त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय.