मुंबईत अधिवेशन सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुपचूप दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या गाठीभेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्लीवारी आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात आहे. शिंदेंनी अचानक केलेल्या या दिल्लीवारीमुळे नेत्यांच्या भुवया उंचावल्यात... राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती, या शिवाय पक्षांतर्गत आमदार वेगवेगळ्या प्रकरणात टार्गेट केले जात आहे. या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत आल्याची माहिती मिळतेय... तर या दौऱ्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र यागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.