अकोला जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झालाय.जिल्ह्यातील प्रकल्प, धरणाच्या पातळीत वाढ होत आहे.महान येथील काटेपूर्णा धरणाची पातळी दीड फुटापर्यंत वाढली.१५ जुलैपर्यंत धरणात २५ टक्के जलसाठा उपलब्ध होता.सध्या अकोला शहराला 7 दिवसांआड पाणीपुरवठा होतोय. तो आता 3 दिवसाआड करण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरू आहे.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी.