महाराष्ट्रात 72 आजी-माजी अधिकारी आणि मंत्र्यांची नावे हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा एका बड्या नेत्याने केला.त्यानंतर ठाण्यात देखील अनेक तक्रारी दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यातच दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केलाय. गेल्या एक वर्षापासून मला न्याय मिळत नाही त्यामुळे अशा बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळेस या महिलेने केली आहे. मात्र याबाबत पोलीस सूत्रांकडून माहिती घेतली असता या महिलेवर अकरा खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. या महिलेने पोलीस महासंचालकाला केलेली तक्रार देखील मागे घेतली असल्याचं समोर आलंय.