औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरामध्ये सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये माजलगाव मतदार संघाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आरटी देशमुख यांचं निधन झालंय. अपघात इतका भीषण होता की देशमुख यांना गंभीर गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.