जर्मनीकडून आता अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांवर दहा टक्के कर लावला जाणार आहे.वाढत्या व्यापार संघर्षाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही जर्मन सरकारकडून हे पाऊल उचललं जाऊ शकतं.अमेरिकेतील टेक सम्राट अल्फाबेट आणि मेटा या सारख्या कंपन्या जर्मनीमध्ये व्यवसाय करताना चतुराईनं कर बुडवत असल्याचा आरोप जर्मनीचे डिजीटल मंत्री फिलीप अॅमथर यांनी केलाय.हा न्याय्य कराचा मुद्दा आहे. सगळेजण जर्मनीत व्यवसाय करत असताना ठराविक अमेरिक कंपन्या मात्र हा कर चुकवत आहेत हे बरोबर नाही असं मतही फिलीप यांनी व्यक्त केलंय.जर्मनीला या कराच्या आड अमेरिकन तंत्रज्ञानावरील अवलंबनही कमी करायचं आहे.मात्र हे करताना व्यापार युद्ध अधिक भडकणार नाही यांची काळजी जर्मन राज्यकर्त्यांना घ्यावी लागणार आहे.