Global News| इस्त्रायलचा हमासला मोठा इशारा, नेमका काय आहे हा इशारा? जाणून घ्या | NDTV मराठी

इस्त्रायलनं हमसाला मोठा इशारा दिलाय. अमेरिक विशेष राजदूतांच्या शस्त्रसंधीच्या अटी मान्य करा अन्यथा संपूर्ण विनाशासाठी तयार रहा असा अशारा इस्त्रायली संरक्षण मंत्री इस्त्रायल कात्झ यांनी दिलाय. अमेरिकेचे मध्य पूर्व आशियाई देशांसाठीचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी १० इस्त्रायली ओलिसांना सोडण्याची अट ठेवलीय. तसंच १८ मृतदेह हमासनं सोपवावेत असंही सांगितलंय. त्याबदल्यात ६० दिवसांची शस्त्रसंधी केली जाईल.तसंच इस्त्रायल १२३६ पॅलेस्टिनी नागरिकांची सुटकाही करेल अशा तरतूदी ठरवण्यात आल्यात.तर इस्त्रायलनं गाझावर चोहोबाजूंनी हल्ला सुरु ठेवल्याचं कात्झ यांनी सांगितलंय. तसंच सर्व ओलिसांच्या सुटकेच्या नजीक आल्याचंही म्हटलंय. तर हमासनं इस्त्रायलचा निरोप मिळालाय मात्र आमच्या मागण्या पू्र्ण होत नसल्याचं हमासनं सांगितलंय. त्यामुळे अद्याप कोंडी कायम आहे.

संबंधित व्हिडीओ