अमेरिकेच्या वायव्य वॉशिंग्टनमध्ये एका ट्रकचा अपघात झाला.हा ट्रक मधमाशांचे पोळे घेऊन निघाला होता. मात्र ट्रक उलटल्यानं त्यातील लाखो मधमाशा ट्रकबाहेर पडल्या आणि साऱ्या महामार्गावर मधमाशांचं साम्राज्यच पसरलं सुमारे ३१ हजार ७५१ किलो वजनाचे हे पोळे होते. शुक्रवारी कॅने़डियन सीमेजवळ हा ट्रक महामार्गावर उलटला महामार्गावरील वळणाचा अंदाज न आल्यानं ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला अशी माहिती मिळतेय.अपघातानंतर या महामार्गावरून प्रवास न करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.