पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसाच्या फ्रान्स दौऱ्यात भारताच्या नौदल सुज्जतेसाठी मोठं पाऊल उचलल्याचं पुढे येतय.फ्रान्सकडून नौदलासाठी 3 स्कॉर्पियन जातीच्या पाणबुड्या भारतात बनवण्याच्या कराराविषयी महत्वाची चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केलं. दक्षिण चीन समुद्र आणि हिंदी महासागरात चीनचा वाढता हस्तक्षेप रोखायचा असेल तर भारतासाठी या पाणबुड्या अतिशय महत्वाच्या आहेत. शिवाय या दौऱ्यात फ्रान्समधील अणूउर्जा निर्मिती केंद्रालाही मोदींनी भेट दिली.भारताच्या भविष्यातील उर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाची ठरणार आहे.