Global Report | अमेरिकन राजकारणाची सुखद बाजू, Donald Trump यांचं वेगळं रूप | NDTV मराठी

शुक्रवारी साऱ्या अमेरिकेचं लक्ष व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसकडे होतं. कारण तिथं दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांची भेट होत होती. काहीतरी धमाका होणार असा अंदाज होता. मात्र या दोन्ही नेत्यांनी अमेरिकेतील सुसंस्कृत लोकशाही आणि राजकारणाचं दर्शन घडवलं आणि सुखद धक्का दिला. त्यातही ट्रम्प यांची खेळीमेळीची उत्तरं वातावरण हलकं करून गेली. ज्या ममदानींच्या नावाचा उच्चारही जाणूनबुजून चुकवला त्यांच्या पाठीवर हसत खेळत थाप देत ट्रम्प यांनी कटुता विसरल्याचं भेटीदरम्यान तरी दाखवून दिलं. तसंच ममदानींनीही पत्रकारांच्या धारदार प्रश्नांनाही तितकीच प्रामाणिक आणि राष्ट्राध्यक्षपदाचा आब राखत उत्तरं दिली. त्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान शिगेला गेलेली कटुता यापुढे काम करताना राहणार नाही याचे संकेत दोन्ही नेत्यांनी दिलेत.. पाहूया या बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ओव्हल भेटीची एक झलक...

संबंधित व्हिडीओ