गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या गुप्त बैठका आणि गाठीभेटींनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यातीह एकत्रच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार गटाला 125 तर शरद पवार गटाला 40 लढणार असल्याची माहिती समोर आलीय.. काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर यावर एकमत झाले असून,आज दुपारी याबाबत अधिकृत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली जाणार आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा झाल्यानंतर पुण्यातही तसाच निर्णय झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.