सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झालीय. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दरात 2 हजार 500 रुपये, तर चांदीच्या दरात 5 हजार 800 रुपयांची घट झाली होती. त्यानंतर दुपारच्या सत्रातही घसरण कायम राहिली आणि सोनं आणखी 1 हजार रुपयांनी, तर चांदी 1 हजार 500 रुपयांनी स्वस्त झाली. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारासंदर्भात झालेल्या समझोत्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंवरील दबाव वाढला असून त्याचा थेट परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर झाल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.