Heat Wave| दुपारी घरीच थांबा! उन्हाची तीव्रता पुन्हा वाढणार; राज्यात उष्णतेची लाट, पारा चाळिशीपार

सर्वसामान्यांनो दुपारी घरीच थांबा.कारण राज्यात उष्णतेची लाट आली आहे. कोकण आणि विदर्भात उन्हाचा कडाका वाढलाय. विदर्भात 'यलो अलर्ट' जारी करण्यात आलाय. तर पुढील काही दिवसांत राज्याचं तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उष्माघाताचा धोका वाढेल. पुढचा आठवडाभर संपूर्ण राज्याची होरपळ होईल असा अंदाज आहे. शनिवारी अकोल्यात सर्वाधिक 42 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. तर राज्यातल्या अनेक शहरांचा पारा चाळिशीपार गेलाय. पुण्याच्या लोहगावमध्ये 40.6 अंश तापमानाची नोंद झालीय. मुंबईचं कमाल तापमान 35 अंशांवर जाईल. तर महामुंबईत कमाल तापमान 38 अंशांवर नोंदवलं जाईल. त्यामुळे नागरिकांनी सर्वतोपरी काळजी घेण्याचं, तसंच भर उन्हात बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ