ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे....वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे...उद्या दुपारी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत....लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 वाजल्यापासून दूपारी 3 वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे....आशा भोसलेंच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत....आशा भोसलेंना हिंदी सिनेसृष्टीची वरस्टाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं....तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय....त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत....हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायलीत. 'दम मारो दम' आणि 'ओम शांति ओम' यांसारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिलीत.