आमदार रोहित पवार यांनी राज्यातील राजकारणाबाबत खळबळजनक दावा केलाय.सत्तेतील सर्वात मोठा पक्ष आपल्याच मित्रपक्षांची शिकार करणार असून, ही प्रक्रिया पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असं त्यांनी म्हटलंय.सध्या गाजत असलेले 'भोंदू प्रकरण' हे सहज नसून ते जाणीवपूर्वक बाहेर काढल्याचा आरोपही त्यांनी केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चेला उधाण आले आहे.