मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झालेत.मराठा आरक्षणाबाबत कुठलीही बैठक झालेली नाही....आणि कुठलेही गुन्हे मागे घेण्यासाठी नकार दिलेला नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आहे....ज्यामध्ये शासकीय संपत्तीचं नुकसान झालेलं आहे ते गुन्हे मागे घेता येत नसल्याचे सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण आहे.... मात्र त्या व्यतिरिक्त संपूर्ण गुन्हे मागे घेतले आहेत आणि अधिवेशनात त्याची आकडेवारी दिल्याचं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलंय.. .तर जो पर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाही तो पर्यंत मी शांत बसणार नाही.. असं मनोज जरांगेंनी म्हटलंय... सरकारने तसा शब्द दिलेला आहे. नाहीतर सर्वात मोठं आंदोलन उभं करून सर्व गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू, असा इशाराही त्यांनी दिलाय..