सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात मुसळधार पाऊस झालाय.चांदोली परिसरात गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे.त्यामुळे ओढे नदी नाले भरून वाहू लागले आहेत.तसेच आसपासच्या परिसरात छोटे मोठे धबधबे प्रवाहित होऊन कोसळू लागले आहेत.पावसाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे सर्वत्र हिरवळ दिसू लागली आहे.