Marathwada Rain| मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर,मराठवाड्यात सरासरीपेक्षा 10पट पाऊस पडणार

मे महिन्यात शेतकरी मशागतीत व्यस्त असताना अवकाळी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली. गेल्या 20 दिवसांपासून सुरू झालेला पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. त्यात आता हवामान विभागाने पुढील 5 दिवसांत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मे महिन्यात 13 मिमी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात यंदा 132 मिमी इतका पाऊस पडला आहे, जो 1030 टक्के जास्त आहे. ज्यात सर्वाधिक पावसाची नोंद लातूर जिल्ह्यात झाली असून, येथे 193.4 मिमी पाऊस झाला आहे. तर त्या खालोखाल धाराशिव जिल्ह्यात 167.5 मिमी पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आले असून धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.

संबंधित व्हिडीओ