Satara| फलटण तालुक्यात मुसळधार पाऊस, 24 ठिकाणी पुलावरून पाणी | NDTV मराठी

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आज दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहू लागले आहेत. बानगंगा नदीने पूर रेषा ओलांडल्याने नदीलगत असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय नदी ओढे नाल्याद्वारे येणाऱ्या पाण्यामुळे 24 ठिकाणी छोट्या मोठ्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेणे सतर्कताम्हणून 10 ठिकाणचे रस्ते बंद करण्याचे लेखी आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत.फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी काही ठिकाची जाऊन स्वतः पाहणी केली.

संबंधित व्हिडीओ