आयआयटी बॉम्बे शिक्षणसंस्थेतील आंदोलन आता चांगलंच तापलंय.. साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर आंदोलकांकडून कारवाईची मागणी केली जात होती. मात्र सलग चार दिवस आंदोलन करूनही कॉलेज प्रशासनाने कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होत चाललंय. दरम्यान आयआयटी बॉम्बे फॅकल्टी फोरमने प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलंय. प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांना आयआयटी बॉम्बेच्या सेवेतून निलंबित केलेलं नाही. ते संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांची कामगिरी चांगली असल्याचं फोरमने म्हटलंय.
IIT Bombay | Prof. Suryanarayana Dulla not suspended after all; is the college administration backing him?