राज्यातील पहिल्या आरोग्य एआय प्रकल्पाचे कोल्हापुरात लोकार्पण करण्यात आलं. या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विशेष कौतुक करून तेथील आरोग्य यंत्रणेची माहिती दिली. उत्तर प्रदेशातील HOPE या मॉडेलवर आधारित महाराष्ट्रातील आरोग्य एआय प्रकल्प राबविण्यात येत आहे.