दुष्काळाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागातील नगदी पीक असलेल्या लाल कांद्याला बसला असून विहिरींनी तळ गाठल्याने लाल कांद्याची लागवड न झाल्याने कांद्याचे रोपे करपून गेले तर काही ठिकाणी लागवड केलेले कांदा पिक पूर्णतः जळून खाक झाला आहे.खरं तर लाल कांदा नाशिकच्या चांदवड, येवला, नांदगाव, मालेगाव तसेच देवळा तालुक्यातील प्रमुख नगदी पीक मानले जाते.मात्र पाण्याअभावी लाल कांद्याचे उत्पादन येणार नसल्याने पुढचे आर्थिक नियोजन कसा करावा असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडलाय. चांदवडच्या शिंगवे शिवारातून करपलेल्या कांद्याच्या शेतातून आढावा घेत कांदा उत्पादक सुभाष झाल्टे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी...