Jalgaon Crime|चाळीसगावात आईसोबत कामावर गेलेल्या अल्पवयीन मुलीवर मैत्रिणीच्या मदतीनं सामूहिक अत्याचार

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरालगत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी आईसोबत कामासाठी गेली असताना आई पाणी भरण्यासाठी घरी गेल्याची संधी साधून हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. पीडितेच्या 16 वर्षीय अल्पवयीन मैत्रिणीने तिला महिला स्वच्छतागृहात नेले, जिथे दोन आरोपी तरुण आधीपासून दबा धरून बसले होते. पीडिता स्वच्छतागृहात पोहोचताच दोन्ही आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याचा आरोप असून, मुलीने आरडाओरडा केल्यानंतर अल्पवयीन मैत्रिणीने तिचे तोंड दाबून हात पकडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर हा प्रकार कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही पीडितेला देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील दोन्ही आरोपी तरुणांना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, अल्पवयीन आरोपी मुलीविरोधातही कायद्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे. विभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे.

संबंधित व्हिडीओ