छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सीएसएमटी स्थानक पुनर्विकासासाठी मध्य रेल्वेने 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या कालावधीत विशेष ब्लॉक घेण्याचं ठरवलं. हा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. याकाळात प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. परिणामी, सीएसएमटी स्थानकावरून सुटणाऱ्या आणि तिथे येणाऱ्या 8 लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्या आता सीएसएमटीऐवजी दादर किंवा ठाणे स्थानकावरच थांबवल्या जातील.
Railway block between October 1 and December 15 for CSMT station redevelopment work.