Jalgaon Drought| दुष्काळाची भीषणता अधिक गडद, अंतुर्ली गावातून 'NDTV मराठी'चा Ground Report

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावात तर आधी वादळी वाऱ्याचा तडाखा आणि आता दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले आहेत. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मंजूर होऊनही अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी वादळी वाऱ्याची आणि दुष्काळाची नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. अंतुर्ली गावातील पारावरून दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..

संबंधित व्हिडीओ