Latur पालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर झाडली गोळी; प्रकृती गंभीर | NDTV मराठी

लातूरच्या महापालिका आयुक्तांनी स्वतःवर बंदुकने गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.आयुक्त बाबासाहेब मनोहरे स्वतःवर गोळी झाडली.यात त्यांच्या डोक्यात गोळी लागल्याने आयुक्त मनोहरे गंभीर जखमी झालेत.त्यांच्यावर लातुरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याचे नेमके कारण मात्र समोर आलेले नाही.पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानातून रिव्हॉल्वर ताब्यात घेतले आहे.आपल्या कुटुंबीयासोबत जेवण केल्यानंतर ते त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि त्यांनी गोळी झाडून घेतल्याची माहिती मिळतेय.घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनीलकुमार कांबळे यांनी..

संबंधित व्हिडीओ