मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी कोल्हापुरात लिंगायत समाजाचे मुख्य आंदोलन सुरू आहे.. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सर्वजण ठिय्या मांडून बसले आहेत.. राज्य शासनाने लिंगायत समाजाच्या विकासासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक जाहीर करा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.. आजपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे. या उपोषणाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लिंगायत समाज बांधव सहभागी झाले.