महाबळेश्वरमध्ये चोरून महिलांचे फोटो काढणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली.पाच तरूण महिला आणि काही मुलींचे संशयास्पदरित्या फोटो काढत असताना आढळले.त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पाचही जणांना अटक केली.पाचही तरूण मालेगावचे असून त्यांच्या मोबाईलमध्ये तब्बल अडीच हजार फोटो आढळून आलेत. यात गोव्यातही त्यांनी काही महिला, मुलींचे फोटो काढल्याचं समोर आलंय. हे फोटो काढण्यामागचं नेमकं कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे.