कर्जमाफीबाबत विचारताच माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना सुनावलंय.कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे तुम्ही काय करता ? शेतीमध्ये एक रुपयाही तरी गुंतवणूक करता का ? असा सवाल कोकाटेंनी शेतकऱ्यांना विचारलाय. विम्याचे पैसे द्या म्हणतात आणि पैसे आले की साखरपुडे कर, लग्न करता असंही कोकाटे म्हणालेत.कोकाटे काहीही बोलले असतील तर शेतकऱ्यांची आम्ही सरकारतर्फे क्षमा मागू अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीय.. तर सरकारमध्ये काम करत असताना विचारपूर्वक वक्तव्य केलं पाहिजे, असं अजित पवारांनी म्हटलंय..